संसदेत असलेलं शिवसेनेचं कार्यालय काही दिवसांपूर्वी शिंदे गटाला देण्यात आलेलं होतं. परंतु आता ठाकरे गटाला नवीन संसदेमध्ये स्वतंत्र कार्यालय मिळण्याची शक्यता आहे. आज खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर पक्षावर हक्क सांगायला सुरुवात केली. आता पक्षच एकनाथ शिंदेंच्या ताब्यात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच आता ठाकरे गटासाठी एक बातमी आहे.
काही दिवसांपूर्वी संसदेमध्ये असलेल्या शिवसेना कार्यालयाचा ताबा शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आलेला होता. आता ठाकरे गटाला नवीन संसदेत कार्यालय मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आहे