चांदवडच्या राहुड घाटात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात.. आठ ते दहा जणांचा मृत्यू.

चांदवड -मुंबई -आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून, या अपघातात जवळपास साधारण ८ ते १० प्रवाशांचा जागीच मृत्यू तर २२ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आत्ताच समोर आली आहे. जखमींना चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत असून, पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, मदत कार्य सुरू आहे. अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली आहे.
बातमी प्रतिनिधी – सुनील क्षिरसागर,विंचूर.

Share this News