महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा निवडणूक निकाल लागून आठवडा उलटला असून महायुतीला स्पष्ट बहुमत कौल मिळाला तरी मुख्यमंत्री कोण अजून निश्चित होत अनेक घटना तज्ञांनी सांगितलं होतं की ४८ तासाच्या आत सरकारचा शपथ विधी झाला पाहिजे नाही तर राष्ट्रपती राजवट लागेल परंतू आठ दिवस झाले तरी ना मुख्यमंत्री ना शपथविधी ना राष्ट्र्पती राजवट अशी परिस्थिती महाराष्ट्रात पाहवयास मिळत आहे महायुतीतील प्रत्येक घटक पक्ष एक दुसऱ्यावर कुरघोडी करतांना दिसत असून अजूनही मुख्यमंत्री कोण यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे अनेक जण मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधून बसले असून दिल्ली वाऱ्या देखील वाढल्या आहे मुख्यमंत्री पदा सोबत अनेक मंत्री पद आपल्या पक्षाला कसे मिळतील या कडे देखील बारकाईने प्रत्येक पक्षाचं लक्ष ahe