विविध ठिकाणी मोबाईल फोन गहाळ झाल्याच्या तसेच चोरी झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत्या या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केंद्र शासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सी इ आय आर पोर्टलच्या साह्याने तांत्रिक विश्लेषणाद्वारे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला यात नाशिक रोड पोलीस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकाला चांगले यश आले असून राज्यातून तसेच इतर ठिकाण वीस लाख रुपये किमतीचे 130 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर ज्यांचे मोबाईल हरवले आहे त्यांना ते नाशिक रोड पोलीस ठाण्यात बोलून परत देण्यात आले यावेळी मोबाईल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत नाशिक पोलिसांचे आभार मानले सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच पोलीस उपयुक्त मोनिका राऊत, पोलीस सहायक आयुक्त सचिन बारी, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख संदीप पवार, विष्णू गोसावी, हेमंत मेढे, राहुल मेहंदळे यांनी केली आहे
नाशिकः २० लाखांचे हरवलेले मोबाईल तक्रारदारांना परत – नाशिकरोड पोलीस आणि ATC चे उल्लेखनीय कार्य
