संभाजी भिडे यांच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अमरावती येथील एका कार्यक्रमात शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी शिर्डीचे साईबाबा तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बद्दल अपशब्द काढले होते. या प्रकारानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संताप व्यक्त करून संभाजी भिडे यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यात आले त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील काही पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून गुन्हे सुद्धा दाखल झालेय नाशिक रोड येथेही संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले कला व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने माजी आमदार योगेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटले व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यानुसार क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते संतोष गाडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा प्रकार अमरावती येथे घडला असल्याने हा गुन्हा अमरावती पोलिसाकडे वर्ग करण्यात आला आहे.