लासलगाव येथे चोरांचे सत्र चालू

चोरांना पोलिसांचा धाकच राहिला नाही

लासलगाव वेध न्यूज प्रतिनिधी कैलास उपाध्ये

लासलगाव येथून एक किलोमीटर अंतरावर टाकळी विंचूर येथील देशी दारू दुकानावर शुक्रवार मध्यरात्री शटर वाकून दारूची चोरी करण्यात आली दारू दुकानचे मालक ढोमसे यांना सकाळी पायी फिरणाऱ्या नागरिकांनी फोन करून माहिती कळविली लासलगाव पोलीस स्टेशनची संपर्क करून पोलीस नाईक घुमरे यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे . ढोमसे यांच्या दुकानातून 46 दारूचे बॉक्स 142000 rs किमतीचे देशी दारू आणि 600 र चोरी झल्याचे तेथील कर्मचाऱ्याने सांगितले

लासलगाव येथील नागरिक चोरीच्या या धाडसतराने हैराण झाले आहे लासलगाव पोलीस स्टेशनचे रात्री फिरणारी व्हॅन ही व्यवस्थितपणे आपला उपक्रम बजावत असताना ही लासलगाव येथे चोरीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ यांनी ह्या बाईक स्वार तसेच चोरीचया घटना करणाऱ्या चोरांना लवकरच जेरबंद करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. पुढील तपास लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *