महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर वाढला असून राज्याच्या अनेक नद्याना पूर आला आहे तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात अजून पावसाची प्रतीक्षा आहे नाशिक जिल्ह्यासह मराठवाडा ज्या गंगापूर धरण भरण्याची वाट पाहतो त्यागंगापूर धरणात पावसाची सततधार सुरु असून धरण ७०टक्के भरल्याने नाशिककरांची पाण्याची चिंता मिटली आहे आज दुपारी १२वाजता धरणातून ५३९ क्यूसेसने पाणी सोडण्यात येणार असल्याने नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पाऊस असाच सुरु राहिल्यास विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविला जाईल असे प्रशासना कडून कळविण्यात आले आहे