पर्यावरणपूरक गणेशाेत्सव साजरा करण्याचे मनपा आयुक्तांचे अवाहन 

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ दिल्ली यांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्लास्टर अाॅफ पॅरिस (पीअाेपी) मूर्ती विक्री व अायातीचा साठा करण्यात येऊ नये, यादृष्टीने गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापािलका अायुक्त तथा प्रशासक डाॅ. अशाेक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात अाली. उच्च न्यायालयाने नद्यांचे प्रदुषण टाळण्ासाठी पीअाेपीच्या मूर्तींवर विक्री व साठा करण्यास यापूर्वीच बंदी घातलेली अाहे. उच्च न्यायालयाचे निर्देश तसेच प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना केलेल्या अाहेत. त्यानुसार  मूर्ती विक्रेते व साठा करणाऱ्यांनी पालन करावे, असे अावाहन अायुक्त डाॅ. अशाेक करंजकर यांनी केले अाहे.

येत्या १९ सप्टेंबर राेजी गणेशाेत्सवास प्रारंभ हाेत अाहे. तत्पूर्वी गणेश मूर्ती विक्री करणाऱ्या स्टाॅलधारकांनी महानगरपािलकेची परवानगी घ्यावी. ही परवानगी घेताना संबंधीत स्टाॅलधारकांकडून प्लॅस्टर अाॅफ पॅरीसची गणेश मूर्ती विक्री न करण्याबाबतचे हमीपत्र घेतले जाणार अाहे. तसेच डाेंगरे वसतिगृह, ठक्कर डाेम, गाेल्फ क्लब मैदान येथे माेठ्या प्रमाणावर काही खासगी लाेक स्टाॅल उभारले जातात. यामुळे संबंधीत स्टाॅल उभारणाऱ्या खासगी संस्था व व्यक्तींना देखील याबाबतची सूचना केली जाणार अाहे. गाेदावरी नदी व इतर चार उपनद्यांमध्ये प्रदुषण निर्माण हाेणार नाही याची दक्षता घेतली जाणार असून, त्यादृष्टीने शहरासह उपनगरांमध्ये कृत्रिम तलाव उभारले जाणार अाहेत. गेल्या वर्षी २४९ ठिकाणी गणेश मूर्ती विक्रीचे स्टाॅल उभारण्यात अाले हाेते.

विक्रेत्यांनी शाडूमातीच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून द्याव्यात तसेच भाविकांनी देखील शाडूच्याच मूर्ती घेण्यास प्राधान्य द्यावे. तसेच गणेश मूर्तीसाठी पर्यावरणपूरक रंगांचाच वापर करण्याचे अावाहन अायुक्त तथा प्रशासक अशाेक करंजकर यांनी केले अाहे.

महापालिकेच्या बांधकाम, अाराेग्य विभागामार्फत गणेशाेत्सव कालावधीत मूर्ती संकलन केले जाते. त्यानुसार यंदा अाकर्षक कृत्रिम तलाव  व अधिकाधिक गणेश मूर्ती संकलन करणाऱ्या निवडक पथक तसेच कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेतर्फे सत्कार करण्यात येणार असल्याचे अायुक्तांनी सांगितले. बैठकीस उपायुक्त पर्यावरण विभाग डॉ.विजयकुमार मुंडे, उपायुक्त कर विभाग श्रीकांत पवार,शहर अभियंता शिवकुमार वंजारी,घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ.कल्पना कुटे, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, कार्यकारी अभियंता पर्यावरण विभाग राजेंद्र शिंदे, स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक प्रशांत ठोके, शंतून नाईक आदि बैठकीस उपस्थित होते.

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *