*मनपाच्या रस्त्यांची व स्मार्ट सिटीच्या कामाची महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री ना. दादा भुसे यांच्याकडून पाहणी.*

  1. *मनपाच्या रस्त्यांची व स्मार्ट सिटीच्या कामाची महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री ना. दादा भुसे यांच्याकडून पाहणी.

नाशिक महानगरपालिकेच्या विविध रस्त्यांची व स्मार्ट सिटीच्या रस्त्यांच्या कामाची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दादा भुसे यांनी नाशिक महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांच्या समवेत केली.यावेळी विविध कामांच्या सूचना संबंधित विभागांना करण्यात आल्या.तसेच

नाशिक महापालिका हद्दीतील सिटी सेंटर मॉल, त्रिमूर्ती चौक परिसरातील रस्त्यांची पाहणी करण्यात आली. या परिसरातील तसेच शहरातील रस्त्यांना पावसामुळे पडलेले खड्डयांची त्वरित डागडुजी करून खड्डे दुरुस्त करून शहर खड्डे मुक्त करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.दादा भुसे यांनी दिल्या..स्मार्ट सिटी विभागाच्या वतीने चोपडा लॉन्स येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी यावेळी करण्यात आली. सदरच्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी पहाणीच्या वेळी संबंधित विभागास दिले. यावेळी पालकमंत्री ना. दादा भुसे यांच्या समवेत आमदार देवयानी फरांदे, प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर, माजी उपमहापौर अजय बोरस्ते,राजू लवटे, स्मार्ट सिटी विभागाचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, मनपा उपायुक्त श्रीकांत पवार,जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, कार्यकारी अभियंता सचिन जाधव,जितेंद्र पाटोळे,संदेश शिंदे,उपअभियंता नितीन राजपूत हेमंत पठे,सुभाष बहिराम,आदी मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *