नाशिक महानगरपालिका आणि हिरवाणकुर फाउंडेशन आयोजित वृक्ष उत्सवास तीन दिवसा सुमारे २० हजार नाशिककरांनी दिली भेट.
विद्यार्थी दशेतून हरित संस्कार घडवण्यासाठी मनपाचे यशस्वी पाऊल.
नाशिक महानगरपालिका पर्यावरण विभाग व हिरवांकुर फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित तीन दिवसीय वृक्ष उत्सवाचा समारोप उत्सवातील आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन करण्यात आला.
नाशिक महानगरपालिकेच्या वेळी वतीने दि.४ ते ६ ऑगस्ट २०२३ या कालावधीत दादासाहेब गायकवाड सभागृह येथे वृक्ष उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या वृक्ष उत्सवाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. या कार्यक्रमात वृक्षउत्सवा निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या समारोप कार्यक्रमात माजी आमदार नितीन भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, नाशिक महापालिका व हिरवांकुर फाउंडेशनच्या वतीने आयोजित वृक्ष उत्सवाचा उपक्रम हा उल्लेखनीय असून हिरवांकुर फाउंडेशनच्या च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तिकेच्या माध्यमातून सर्व मनपा शाळांमध्ये वृक्षांविषयी माहितीचा हा उपक्रम पोहोचवावा व प्रत्येक नाशिककर हरित साक्षर करण्यासाठी नाशिक मनपा ने पावले उचलावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
वृक्ष उत्सव यशस्वी करण्यासाठी हिरवांकुर फाउंडेशन व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच विविध संस्थांच्या उत्तम योगदानामुळे हा वृक्ष उत्सव यशस्वी करता आला.तसेच या माध्यमातून विद्यार्थी दशेतून हरित संस्कार घडवण्यात मनपा आणि हिरवांकुर संस्थेचा हा उपक्रम यशस्वी झाला असल्याचे मनोगत पर्यावरण विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ.विजयकुमार मुंडे यांनी सांगितले.
*चित्रकला स्पर्धेत ७५० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग*
वृक्षोत्सवानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धांमध्ये ७५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यात पर्यावरण पूरक चित्रे विद्यार्थ्यांनी काढली. या चित्रांचे प्रदर्शन वृक्ष उत्सवात लावण्यात आले होते. यातील उत्कृष्ट चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
माजी आमदार नितीन भोसले,पर्यावरण विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे,उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद,हिरवांकुर फाउंडेशनचे शहा निलय बाबू, सायकलिस्ट फाउंडेशनचे योगेश वारे,हरियाली ट्रस्टचे अध्यक्ष नुरानी हैदर,जितो फाउंडेशनच्या महिला विंगच्या अध्यक्ष कल्पना पाटनी आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी वृक्ष उत्सवात सहकार्य करणाऱ्या विविध संस्थांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला.
हिरवांकुर देशी प्रजाती झाडांची मराठी माहिती पुस्तिकेचे उर्दू आवृत्तीचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आले.
*या वृक्ष उत्सवास तीन दिवसा २०हजार नाशिककर आणि विद्यार्थ्यांनी भेट दिल्याने पर्यावरण संवर्धनासाठी मोठी मदत होणार आहे.*
*नंदिनी नदीकिनारी वृक्षारोपण*
या कार्यक्रम प्रसंगी जितो फाउंडेशनच्या जीतो लेडीज विंग यांचे वतीने नंदिनी नदीकिनारी वृक्षारोपण केले यावेळी अध्यक्ष कल्पना पाटनी,सचिव वैशाली जैन,तसेच मनीषा चोपड़ा
सुनंदा शाह,सोनल दगड़े,कीर्ति नहार आदी उपस्थित होते.वृक्ष उत्सव समारोप सोहळ्याचे आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी व सूत्रसंचालन संतोष मुंडे यांनी केले.
*पारितोषिक विजेते विद्यार्थी*
चित्रकला स्पर्धा विजेते
(ग्रुप १)
इयत्ता १ली ४ थी
१) प्रथम क्रमांक कादंबरी भामरे (४थी) नवरचना विद्यालय
२)द्वितीय क्रमांक – तेजस्वी सोमनाथ निकम (४थी)
प्रा. विद्यालय उंटवाडी.
३) तृतीय क्रमांक
यशश्री काकड (३री)
(ग्रुप २ रा) (५वी ते ७वी)
१)प्रथम क्रमांक
नेहा राजेश सोनार (६वी)
विखे पाटील स्कूल
२) द्वितीय क्रमांक
स्वरा सौरभ कुलकर्णी(६वी) पोतदार स्कूल.
३) तृतीय क्रमांक
राघव पाटील (५वी)
क्लिफर्ड इंटरनॅशनल स्कूल
(ग्रुप ३ )(८ वी ते १० वी)
१)प्रथम क्रमांक
शिवम चंद्रशेखर अमृतकर (९वी) पेठे विद्यालय.
२)द्वितीय क्रमांक
जान्हवी आहेर (८वी) रविंद्रनाथ विद्यालय
३) तृतीय क्रमांक –
जान्हवी हेदुकर (८वी)
ग्लोबल विजन इंटरनॅशनल स्कूल
यासह उतेजनार्थ विजेत्यांनाही पारितोषिके देऊन गौरविण्यात आले