जिल्हा परिषदेतर्फे यंग टॅलेंट हुडकण्याचे काम सुरु -आशिमा मित्तल*

आयमाच्या पुढाकाराने वाय 20 मंथन शिबिर संपन्न

सुपर 50 कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शाळांमधील गुणी रत्ने (यंग टॅलेंट) हुडकून काढण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.या यंग टॅलेंटला आकार देणे, सर्वगुणसंपन्न करण्यात आले आहेव अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा),यंग इंडियन्स आणि केंद्र सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने नाशकात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील युवा उद्योजकांसाठी प्रेरणादायी वाय 20 मंथन शिबिर नुुकतेच आयमाच्या सभागृहात पार पडलीग्रामीण भागातील यंग टॅलेंटला सर्व क्षेत्रात सक्षम बनवायचे असेल तर सरकार आणि इंडस्ट्री यांनी हातात हात घालून काम करण्याची गरज असून.सरकारपुढे अनेक जबाबदार आहेत.त्यामुळे हे कार्य सिद्धिस न्यायचे असेल तर स्वयंसेवी संस्थानी त्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी केले आहे

Bait मित्तल यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तरुणांनी नव्या बदलांना सामोरे जाण्याची तसेच नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचीतयारी ठेवावी.सेमी कंडक्टर आणि मेडिकल इंडस्ट्री या क्षेत्रात नवीन पिढीने स्वतःला झोकून दिल्यास भारताचे भवितव्य निश्चितच उज्वल राहील तसेच रोबोट पद्धतीच्या वापराचे फायदे-तोटेही त्यांनी विषद केले.आपण कुठे असलो तरी आपल्या कामाच्या ठिकाणाचे नियंत्रण करणे आपणास जमले पाहिजे असे मत आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले Bait पांचाळ दिल्लीत याच महिन्यात जी-20 परिषद असून त्याचा पार्श्वभूमीवर यंग इंडियन्सतर्फे देशभरातील 63 शहरांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवून तरुणांमध्ये उद्योजकतेबाबत जागृती निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ,पॉला मॅकग्लेन आणि सुनील खांडबहाले उपस्थित होते.

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *