केदारेश्वर कारखान्याच्या प्रथम मिलरोलरचे पूजन

केदारेश्वर कारखान्याच्या प्रथम मिलरोलरचे पूजन, कारखान्याला कितीही अडचणी आल्या तरी सामोरे जाण्याचा निर्धार — ऋषिकेश ढाकणे

अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव येथील संघर्ष योद्धा बबनरावजी ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालु गळीत हंगामासाठी बसविण्यात आलेल्या प्रथम मिलरोलरचे पुजन प्रसंगी नवनिर्वाचित चेअरमन ऋषिकेश ढाकणे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की ,माजी केंद्रीय मंत्री बबनरावजी ढाकणे ,माजी चेअरमन प्रताप काका ढाकणे व संचालक मंडळांनी माझ्यावर ही चेअरमनपदाची जबाबदारी टाकली त्या जबाबदारीला सामोरे जाण्याचा निर्धार व सभासदांचे व शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम मी करणार आहे ,
नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन माधवराव काटे ,संचालक डॉक्टर प्रकाश घनवट , पांडुरंग काकडे , शिवाजी जाधव , सदाशिव दराडे , सुभाष खंडागळे , मोहनराव दहिफळे , त्रिंबकदादा चेमटे , भाऊसाहेब मुंडे , संदीप चेमटे , आदी नवनिर्वाचित संचालकांचा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला असुन
मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे , प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे , प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार , शेतकी अधिकारी अभिमन्यू विखे, चीफ अकाउंटंट तीर्थराज घुंगरड, परचेस ऑफिसर तुकाराम वारे , चीफ इंजिनियर प्रविण काळूसे, आदिसह संचालक , अधिकारी ,कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

पांडुरंग निंबाळकर
अहमदनगर , शेवगाव

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *