*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी दिलीप खैरे यांची नियुक्ती*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी दिलीप खैरे यांची नियुक्ती*

*नाशिक,दि.२७ डिसेंबर :-* राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे विश्वासू श्री. दिलीप खैरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्याकडून श्री.खैरे यांना नियुक्तीपत्र प्राप्त झाले आहे.

या निवडीबद्दल श्री.दिलीप खैरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मुंबई विभागीय अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांचे आभार मानले आहे.

मंत्री छगन भुजबळ यांचे विश्वासू असलेले दिलीप खैरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत या अगोदर देखील अनेक महत्वाची पद यशस्वीपणे सांभाळली आहे. पक्षाच्या विविध उपक्रमामध्ये व पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी संधी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निवडीनंतर यापुढील काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची धेय्य धोरणे जनतेपर्यंत पोहचवून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास श्री.दिलीप खैरे यांनी व्यक्त केला आहे.

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *