नाशिक जिल्हा कॅटरर्स असोसिएशनकडून २० क्षयरुग्ण दत्तक, सहा महिने पोषण आहाराचे वाटप करणार, मनपाच्या आवाहनाला दानशूर व्यक्ती, संस्थांकडून प्रतिसाद…*

नाशिक जिल्हा कॅटरर्स असोसिएशन, नाशिक, यांनी प्रधाममंत्री टीबी मुक्त अभियानांतर्गत २० क्षयरुग्णांना दत्तक घेऊन पोषण आहाराचे वाटप केले. आतापर्यंत एकूण ३१ क्षयरुग्ण दत्तक घेऊन प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियान ‘ *निक्षय मित्र* ’ नाशिक जिल्हा कॅटरर्स असोसिएशन, नाशिक यांनी नाशिक शहर क्षयमुक्त करण्यासाठी मनपा क्षयरोग पथक नाशिक (टीयु) अंतर्गत मायको दवाखाना, दिंडोरी रोड, पंचवटी या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपचार घेत असलेल्या ३१ क्षयरुग्णांना सामाजिक बांधिलकी आणि क्षयरोग मुक्त भारत अभियानास सहाय्य म्हणून पुढील ६ महिने पोषण आहार देण्यास संमती दर्शविली आहे.
डॉ.अशोक करंजकर, आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रिय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम विभागाच्या माध्यमातून नाशिक जिल्हा कॅटरर्स असोसिएशन, नाशिकचे अध्यक्ष, राजु व्यास यांचे माध्यमातून आज सं. भा. नारगुडे, सह आयुक्त, (अन्न) , मुकुंद डोंगरिकर, सह आयुक्त, (औषध ), नाशिक विभाग, नाशिक यांचे हस्ते पोषण आहार वाटप करण्यात आले, याप्रसंगी उ. सि. लोहेकर, सहाय्यक आयुक्त, (अन्न), वि. प. पाटील, सहाय्यक आयुक्त, (अन्न), म.मो. सानप, सहाय्यक आयुक्त, (अन्न), वि.पा.धवड, सहाय्यक आयुक्त, (अन्न), उपस्थित होते तसेच केटरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष, अनिल जोशी, सचिव संदीप सोनार, सहसचिव, भास्कर दिंडे, सदस्य श्रीकांत निरगुडकर, अशोक शर्मा, आशिष विश्वकर्मा, पंकज पाटील, स्वाती पाटील, चेनाराम चौधरी, मनोहर गौंड, सुखदेव गौंड, ललित गौंड, कुणाल वाणी, शामलाल गौंड यांनी क्षयरुग्ण दत्तक घेतले आहेत याप्रसंगी उपाध्यक्ष अनिल जोशी, पंकज पाटील, भास्कर शिंदे, अक्षय सांत्राम, स्वाती पाटील, गुजी व्यास उपस्थित होते.
या उपक्रमास नाशिक जिल्हा कॅटरर्स असोसिएशनने पुढाकार घेऊन सदस्यांनी हातभार लावला आहे.
नाशिक जिल्हा कॅटरर्स असोसिएशचे अध्यक्ष राजु व्यास उपस्थित होते.
या कार्यक्रमास शहर क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे, उपस्थित होते त्यांनी क्षयरुग्णांना सकस आहार औषधी नियमित व वेळेवर घेतल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होतो त्यासाठी समाजातून दानशूर व्यक्तिंनी पुढे यावे असे आवाहन केले.
क्षयरुग्णांना मदत करण्यासाठी ज्या संस्था, व्यक्ती पुढे येतात आणि सहाय्य करतात त्यांना ‘निक्षय मित्र’ म्हटले जाते. सामाजिक बांधिलकी जपत क्षयरुग्णांचे ‘निक्षय मित्र’ व्हावे, याकरिता *डॉ. कल्पना कुटे , शहर क्षयरोग अधिकारी, महानगरपालिका, नाशिक, यांनी शहर क्षयरोग कार्यालय, जुनी मनपा ईमारत, पंडित कॉलनी, नाशिक, दूरध्वनी क्र.२३१४१३२* येथे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
………………………………………………..

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *