पोलीस आयुक्तालय हद्दीत नागरिकांची लुटमार, मारहाण, दुखापत व दहशत

  • || प्रेसनोट ||

 

दिनांक 25/07/2023

 

पोलीस आयुक्तालय हद्दीत नागरिकांची लुटमार, मारहाण, दुखापत व दहशत निर्माण करुन जनजीवन विस्कळीत करणाऱ्या सरकारवाडा येथील गुंडावर एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी नाशिक शहरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करून जनजीवन विस्कळीत करणा-या इसमांची माहिती काढुन एम.पी.डी.ए.कायदयान्वये कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.

त्यानुसार सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील इसम नामे हर्षद सुनिल पाटणकर वय २५ वर्षे रा बेथेलनगर, शरणपुररोड नाशिक याने त्याची सरकारवाडा, गंगापुर, पंचवटी, इंदिरानगर, उपनगर आणि नजीकच्या लगतच्या परिसरात दहशत कायम रहावी यासाठी त्याने सर्वसामान्य नागरिकांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवून तसेच गैरकायदयाची मंडळी जमवुन मारहाणकरुन लोकांच्या मनात भिती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. त्याच्या गुन्हेगारीला प्रतिबंध होणेसाठी त्यास सन २०२२ मध्ये नाशिक शहर व नाशिक ग्रामिण हददीतुन हददपार करण्यात आले होते.

इसम नामे हर्षद सुनिल पाटणकर याने हडपार कालावधी मध्ये पुन्हा गुन्हेगारी कृत्य चालू ठेवून जनजिवन विस्कळीत केले होते. सदर गुन्हेगार याचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याच्या वागण्यामध्ये कोणत्याही प्रकारे सुधारण होत नसल्याने मा.पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी त्यास मध्यवर्ती कारागृह, नाशिकरोड येथे एम.पी. डी. ए. कायदा सन १९८१ चे कलम ३ (२) अन्वये स्थानबध्द करणे बाबतचे आदेश दिनांक २४/०७/२०२३ रोजी जारी केले आहेत.

गुन्हेगार इसम नामे हर्षद सुनिल पाटणकर याचे विरूध्द सरकारवाडा, पंचवटी, गंगापुर, इंदिरानगर,

उपनगर पोलीस ठाणे येथे गंभीर गुन्हे दाखल आहेत. जसे घातक हत्यारांनी जबर दुखापत, चोरी, घरफोडी चोरी,

शिवीगाळ व दमदाटी करून लुटमार, खुनाचा प्रयत्न, मालमत्तेचे नुकसान, मनाई आदेशाचे तसेच हददपार

  • आदेशाचे उल्लंघन, विनापरवाना शस्त्र बाळगुन गुन्हे करणे, जबरदस्ती घरात घुसने, स्फोटक पदार्थाद्वारे नुकसान करणे इत्यादी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी नमुद इसमाने नाशिक शहरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करून जनजीवन विस्कळीत केल्याने नाशिक शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था आवाधीत राहावी त्यासाठी एम.पी. डी. ए. कायदयान्वये स्थानबध्दतेची प्रतिबंधक कारवाई केल्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांनी सदर कारवाईबाबत समाधान व्यक्त केले आहे. यापुढे देखील नाशिक शहरातील जवजीवन विस्कळीत करणाऱ्या व समाज स्वास्थ्य बिघडविणाऱ्या गुन्हेगार इसमांचा गुन्हयांचा अभिलेख काढण्याचे कामकाज चालु असुन त्यांचेवर एम. पी. डी. ए. कायदयाच्या तरतुदीनुसार प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु राहणार

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *