उपनगर पोलीसांनी गाडया फोडणा-या आरोपीतांना ०३ तासात ठोकल्या बेडया

प्रेस नोट ॥

 

दिनांक २५/०७/२०२३

 

  • (उपनगर पोलीसांनी गाडया फोडणा-या आरोपीतांना ०३ तासात ठोकल्या बेडया)

दिनांक २५/०७/२०२३ रोजी मध्यरात्री १२.०० वा. सुमारास धोंगडे मळा, राजलक्ष्मी मंगल कार्यालय, नाशिकरोड, नाशिक येथिल काही इसमांनी रस्त्याच्या कडेला लागलेल्या काही कारण नसतांना चार चाकी गाडयाची तोडफोड केल्याची माहिती उपनगर पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली. सदर बाबत माहिती प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस आयुक्त सो श्री अंकुश शिंदे सो यांच्या मार्गदर्शननानुसार मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. प्रशांत बच्छाव, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२, मोनिका राउत, मा. सहा. पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग श्री. आनंदा वाघ सो, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. सिताराम कोल्हे, वपोनि / विजय ढमाळ, वपोनि / रणजीत नलावडे यांनी घटनास्थळी भेट देवून उपनगर पोलीस ठाणे पोलीस पथकास आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या. तसेच उपनगर पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथक, गुन्हे शाखा युनीट १ व २ असे पथकास रवाना केले.

 

उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय पगारे यांच्या मार्गदर्शनानुसार उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सपोनि चौधरी व अंमलदार पोहवा विनोद लखन, पोना सोमनाथ गुंड, पोशि पंकज कर्पे, पोशि गौरव गव की, अनिल शिंदे पोशि जयंत शिंदे, पोशि राहुल जगताप, पोशि सुरज गवळी, पोशि सौरभ लोंढे, यांनी संशयित आरोपीचा शोध घेण्यास दोन वेगवेगळ्या गटात पथक रवाना झाले. पो ना गुंड, पोशि गौरव गवळी यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयित आरोपींची माहिती मिळवली तर सपोनि / सचिन चौधरी व यांना आरोपी भगुर गावात नदी किनारी लपून बसल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फतीने प्राप्त झाली. मिळालेल्या गुप्त बातमी प्रमाणे गुन्हेशोध पथकाचे मिळालेल्या पोहवा विनोद लखन, पोशि पंकज कर्पे, पोशि सौरभ लोंढे, हे सदर ठिकाणी खात्री करणे कामी पोहोचले. त्यामध्ये भगुर नदीपात्रा जवळ पोलीस आल्याची चाहूल लागल्याने आरोपी पळून जावू लागले. गुन्हे शोध पथकाचे पोशि पंकज कर्पे यांनी धाडसाने व अतिशय चपळाईने आरोपींच्या अंगावर धाव दोन आरोपींना अडवले. त्याचे मागोमाग पोशि सौरभ लोंढे यांनी त्यांचे मदतीस जावून दोन्ही आरोपींना पकडून ताब्यात घेतले. नदीच्या पात्रात उडी मारून पळून जावू पाहणारे आरोपी यांच्या मागे जिवाची पर्वा न करता पोहवा लखन व सपोनि सचिन चौधरी यांनी आरोपींच्या पाठीमागे नदी पात्रात उडी मारून दोन आरोपींना ताब्यात घेतले.

 

१) बाशी उर्फ शुभम बेहेनवाल, वय २१ वर्षे, रा. फर्नांडीसवाडी, जयभवानी रोड, उपनगर, नाशिक

२) रोशन पवार उर्फ नेम्या वय २४ वर्षे, रा. फर्नांडीसवाडी, जयभवानी रोड, उपनगर, नाशिक ३) सत्यम डेनवाल उर्फ भैयु वय २१ वर्षे, रा. फर्नांडीसवाडी, जयभवानी रोड, उपनगर, नाशिक

 

४) मोईज शेख वय १९ वर्षे, रा. विहीतगाव नाशिक रोड नाशिक ठिकाणी उपस्थिक स्थानिक नागरिकांनी अचानक झालेल्या प्रकारामुळे पोलीसांनी त्यांना मदतीचे आवाहन केले असता पोलीस पथकास सहकार्य केले. सदर बाबत प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यास गुन्हा रजि क्र. ३०२ / २०२३ कलम ३९५, ३०७, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल आहे

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *