अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील सुळे पिंपळगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेला गट क्रमांक 86 या क्षेत्रातील तीन हेक्टर 92 आर शासनाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे येथीलच बोरुडे कुटुंबीयांनी अतिक्रमण केले असल्याने येथील ग्रामपंचायत ने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गावच्या पाणी प्रश्नासाठी या क्षेत्रात विहिरीसाठी जागेची मागणी केली होती, यावर ग्रामस्थांनी रास्ता रोको देखील केला होता यामध्ये येथीलच मासाळकर या वडारी समाजाने सहभाग घेतल्याने बोरुडे यांनी 11 जनांवर पूर्व वैमनश्यातून अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदे अंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे गुन्हे मागे घेण्यासाठी शेवगाव तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना वडार समाजाचे अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ शेलार , भोरूशेठ म्हस्के ,विजय धनवडे ,संदीप म्हस्के ,संतोष मासाळकर ,आबासाहेब वाल्हेकर ,ऋषिकेश देशमुख, दिलीप म्हस्के आदींनी निवेदन दिले असून केलेले खोटे गुन्हे मागे न घेतल्यास वडार समाज रस्त्यावर उतरणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष शेलार यांनी सांगितले
Related Posts
नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागा मार्फत स्मार्ट स्कूल प्रकल्प
- Akshay T
- October 13, 2023
- 0