सातपूर मनपा विभागीय कार्यालयाच्या वतीने मेरी मिट्टि मेरा देश अभियान रॅली द्वारे संपन्न.
नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालय येथे मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाचा शुभारंभ नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त तथा मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमाचे समन्वयक डॉ.विजयकुमार मुंडे यांचे हस्ते झाला.
मेरी मिट्टी मेरा देश या अभियानास शाळा क्रमांक ३० येथून मेरी मिट्टी मेरा देशचा अमृत कलश पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी स्वारबाबा नगर मार्गे विभागीय कार्यालयापर्यंत रॅलीद्वारे आणला होता. रॅलीमध्ये मेरी मिट्टी मेरा देश, हम सब एक है ,भारत माता की जय, वंदे मातरम आदी घोषणा देऊन परिसर देशभक्तीपर वातावरणात दुमदुमून गेला होता. या रॅलीमध्ये शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी आणि नाशिक महानगरपालिका सातपूर विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. या रॅलीचे आयोजन सातपूर विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी केले होते. रॅलीमध्ये नाशिक महानगरपालिका सातपूर विभागाचे उप अभियंता दत्तात्रय कोल्हे,रवी पाटील,पोटिंदे,काळे,जाहिरात परवाना विभागाचे खरे, बेंडकोळी,संजय कोठुळे, पठाण,विलास काळे घरपट्टी विभागाचे हाशमी ,कडाळे, वाघ, निलेश काळे , मंडलिक,बाधकाम विभागाचे अभियंता सोनवणे शिक्षक विजय पाटील, प्रेम ब्राह्मणकर,शिक्षिका वृषाली देवरे, पुनम भामरे,यांसह एस के पोटिंदे, अण्णा काळे, आदी अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. मेरी मिट्टि मेरा देश या रॅलीचा समारोप सातपूर विभागीय कार्यालय येथे पंचप्रण शपथ घेऊन करण्यात आला. यावेळी उपायुक्त डॉ.विजयकुमार मुंडे यांनी विद्यार्थी व उपस्थितांना मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाचे महत्त्व विशद करून दिले. रॅलीतील अमृतकलश नाशिक ते मुंबई ते दिल्ली जाणार असून दिल्ली येथील अमृत उद्यानासाठी यातील माती वापरली जाणार असल्याची माहिती दिली. गेल्या महिन्याभरापासून नाशिककरांनी मेरी मिट्टी मेरा देश अभियानात सक्रिय सहभाग नोंदविल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.या रॅलीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले. रॅली समारोप प्रसंगी आभार प्रदर्शन शाळा क्रमांक ३०चे मुख्याध्यापक नितीन चौधरी यांनी केले.