अनिल गुंजाळ…
आदिवासी बांधवांच्या वतीने आज नाशिकमध्ये भव्य “उलगुलान मोर्चा” आयोजित करण्यात आला आहे. धनगर समाजासह इतर समाजाला आदिवासी समाजाच्या कोट्यातून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसाठी राज्यातील आदिवासी बांधवानी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे.
पेसा अंतर्गत होणाऱ्या नोकर भरतीची प्रभावी पणे अंमलबजावणी करावी, मणिपूर घटनेच्या निषेधार्थ सटाणा आणि शिरपूर येथील आदिवसी बांधवांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अहवाल त्वरित सादर करावा यांसह इतर विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधव भर उन्हात रस्त्यावर उतरला आहे.
यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आदिवासी बांधवांनी घोषणाबाजी केली आहे.