नाशिक पुणे महामार्गावरील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल येथील धोकादायक रित्या वाकलेल्या दिशादर्शक फलकाला हटवण्याचे काम नाशिक महानगरपालिकेच्या आणि राज्य महामार्ग प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे
या दिशादर्शक फलकाला एक कंटेनर धडकल्यामुळे या फलकाचे स्तंभ वाकलेले होते आणि इथे मोठे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती
शिवाय या स्तंभांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे येथे दिवसेंदिवस अपघात होत होते
स्थानिकांनी या ठिकाणी त्वरित उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला निवेदने दिली होती त्याची दखल घेत प्रशासनाने अखेरीस आज हा धोकादायक फलक येथून हटवण्याचे काम सुरू केले आहे
हे काम सुरू असताना नाशिक पुणे महामार्गावरील एका लेनची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे
दत्त मंदिर सिग्नल ते बिटको चौका दरम्यान वाहतूक पोलीस, महानगरपालिकेचे अधिकारी, आणि नॅशनल हायवे अथोरिटी चे अधिकारी यांनी एकत्र येत वाहतुकीची कोंडी न होऊ देता हा फलक हटवण्याचे काम हाती घेतले आहे