दरोडा व शस्त्र विरोधी पथकाची कामगिरी एकाच दिवशी ३ ठिकाणी सापळे रचुन तीन आरोपीतांसह ३ अग्नीशस्त्र व ५ जिवंत काडतुस जप्त केले.
मा. श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तालयात नाशिक शहर हद्दीत अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळणारे इसम / गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्याकरीता दरोडा व शस्त्र विरोधी पथक तयार / निर्माण करून कारवाई करणे बाबत आदेशीत केले आहे. त्याअनुषंगाने मा. श्री प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. श्री सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) नाशिक शहर यांनी अवैध अग्नीशस्त्र बाळणा-या गुन्हेगारांची माहिती काढुन कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.
दिनांक २४/०७/२०२३ रोजी दरोडा व शस्त्रविरोधी पथक, नाशिक शहर यांना गोपनिय बातमीदारांकडुन अग्नीशस्त्रे बाळगणारे व विक्री करणारे इसमांची माहीती प्राप्त झाली. दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने मिळालेल्या माहीतीच्या आधारे दिवसभरात वेगवेगळ्या पोलीस ठाणेचे हद्दीत सापळे लावुन ३ गावठी पिस्टल ०५ जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले आहेत.
सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत नासरेथ नगर, शरणपुर रोड येथुन इसम नामे प्रविण विजय त्रिभुवन वय २६ वर्षे, रा. त्रिमुर्ती चौक, कांकरीया सुपर मार्केट शेजारी, सिडको, नाशिक यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन १ गावठी पिस्टल व १ जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले.
गंगापुर पोलीस ठाणे हद्दीत विद्याविकास सर्कलजवळ, प्रसाद सर्कल नाना-नानी पार्क, गंगापुर रोड, नाशिक येथुन इसम नामे जयपाल संजय गायकवाड वय २४ वर्षे, रा. के.बी.टी. सर्कल, मधुबंधन सोसा., रूम नं. ४, गंगापुर रोड, नाशिक यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन १ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले.
अंबड पोलीस ठाणे हद्दीत औदुंबर कॉर्नर, शाहुनगर, दत्त मंदीराच्यसा भिंतीलगत, सिडको, अंबड, नाशिक येथुन अक्षय आनंदा सैंदाणे वय २६ वर्षे, रा. दत्त चौक, सरस्वती चौक, सिडको, नाशिक यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन १ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले.
तरी सदर तीनही आरोपीतांविरोधात गंगापुर, सरकारवाडा व अंबड पो.स्टे. येथे कलम ३,२५,५, २५ शस्त्र अधिनियम सह १३५ मपोका अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त (गुन्हे), नाशिक शहर, मा. श्री. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व शस्त्र विरोधी पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक के. टी. रोंदळे व पोलीस अंमलदार पोलीस हवालदार वियजकुमार सुर्यवंशी, पोलीस नाईक मोहन देशमुख, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, प्रविण चव्हाण, युवराज गायकवाड, सागर बोधले, तेजस मते, संदीप डावरे, भरत राउत यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली