शौर्य यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत

नासिकरोड..छत्रपति शिवाजी महाराजांचा 350 शिवराज्याभिषेक निमीत्ताने विश्व हिंदू परिषद तसेच बजरंगदल कडून भव्य शौर्ययात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना या यात्रेचे नाशिकरोड परिसरात आगमन झाले. विश्व हिंदू परिषद यांनी नियुक्त केलेले शौर्य यात्रा नाशिकरोड प्रमूख विजय सुरेश पुरकर,संग्राम बिंदुमाधव फडके, प्रशांत नागरे होते..तसेच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी शैलेश उदावत,किरण कुमावत, विनोद यादव, दत्ता मोहदवे, राहुल सहाणे, यांच्या प्रयत्नातून यात्रा भव्य दिव्य पार पडली.

यावेळी नांदूरगाव ग्रामस्थांनी व बजरंग दलाच्या कार्यकरत्यानी शौर्य यात्रेचे स्वागत केले नाशिकरोड परिसरा विविध ठिकाणी शौर्य यात्रेच स्वागत करण्यात आले तसेच शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले .विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपति शिवाजी महाराज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले शौर्य यात्रेची सांगता वडनेरगाव येथे टाळ मृदुंगाच्या घोषात शिवरायांचा महाआरती करून झाली.

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *