नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागा मार्फत स्मार्ट स्कूल प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सदर प्रकल्पांतर्गत मा. श्री बी. टी. पाटील, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत पॅलेडियम कन्सल्टिंग इंडिया प्रा. लि. यांची प्रकल्प सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सदर स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत नाशिक स्मार्ट सिटी मार्फत एकूण ८२ मनपा शाळांचे स्मार्ट स्कूल मध्ये रूपांतर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सदर प्रकल्पांतर्गत ८२ मनपा शाळांमध्ये ६५६ स्मार्ट क्लासरूम, डिजिटल अभ्यासक्रम, ६९ संगणक कक्ष, CCTV प्रणाली, शाळा प्रशासन प्रणाली (सॉफ्टवेअर) आदि सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
या प्रकल्पांतर्गत शाळांमध्ये खालील प्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
• स्मार्ट क्लासरूम (६५६): ७५” इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल, डिजिटल अभ्यासक्रम (डिजिटल कन्टेन्ट), लॅन कनेक्टिव्हिटी, ग्रीन बोर्ड, सॉफ्ट पिन बोर्ड, विद्यार्थी बेंच, शिक्षक टेबल, शिक्षक खुर्ची, डस्टबिन, एलईडी ट्यूब लाइट्स, छतावरील पंखे, रंगकाम.
• संगणक कक्ष (६९): २० डेस्कटॉप संगणक, १ हाय-एंड संगणक (स्थानिक सर्व्हर), प्रिंटर, LAN कनेक्टिव्हिटी, नेटवर्क रॅक, विंडोज ओएस, मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूट आणि अँटीव्हायरस सॉफ्टवेअर, एअर कंडिशनर, अग्निशामक यंत्रे, ग्रीन बोर्ड, सॉफ्ट पिन बोर्ड, कॉम्प्युटर टेबल, खुर्ची, शिक्षक टेबल, डस्टबिन, शू रॅक, रंगकाम.
• मुख्याध्यापक कक्ष (६९): २ डेस्कटॉप संगणक, Android टॅब्लेट, प्रिंटर. सीसीटीव्ही कॅमेरा फीडचे निरीक्षण करण्यासाठी ३२” एलईडी मॉनिटर, संगणक टेबल, संगणक खुर्ची,डस्टबिन, पेंटिंग आणि किरकोळ दुरुस्ती
• शालेय स्तर (६९): क्लाउड आधारित शाळा प्रशासन प्रणाली, २००Mbps च्या किमान गतीसह ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी, बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली, सीसीटीव्ही यंत्रणा.
स्मार्ट सुविधा सोबत मनपा शाळेतील विद्यार्थ्याना स्मार्ट अध्ययन व अध्यापन मिळण्याच्या दृष्टिकोनातून मा. श्री बी. टी. पाटील, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा शाळेतील सुमारे ७५०+ शिक्षकांना तंत्रज्ञानाभिमुख बनविण्यासाठी व तंत्रज्ञानाधिष्टीत अध्ययन आणि अध्यापन होणेसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
पहिल्या टप्प्यात ३१ मनपा शाळेतील शिक्षकांना दि. ४ व ५ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रशिक्षण देण्यात आले. दुसऱ्या टप्यात ५१ मनपा शाळेतील शिक्षकांना दि. ११ व १२ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रशिक्षण देण्यात आले. या व्यतिरिक्त सदर मनपा शाळेतील प्रत्येकी २ तंत्र स्नेही शिक्षकांना (६२) संगणक कक्ष संबंधित सुविधांच्या वापराचे विशेष प्रशिक्षण पहिल्या टप्प्यात देण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षणात खालील विषयांचा समावेश करण्यात आला
• स्मार्ट बोर्ड (Digital फळा) चा वापर करणे.
• डिजिटल अभ्यासक्रमाचा उपयोग करणे.
• मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील अप्लीकेशन्स जसे MS-Word, MS-Excel, MS- Power Ponit चा वापर करणे.
• इंटरनेट अप्लीकेशन्स जसे Internet Browser, Email चा वापर करणे.
• शाळा प्रशासन सॉफ्टवेअर प्रणाली (स्कूल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर) वापरण्याबाबतची ची माहिती.
सदर प्रशिक्षणाच्या सुरवातीला मा. श्री बी. टी. पाटील, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना या प्रशिक्षणाची आवश्यकता आणि महत्व या विषयी संबोधित केले. सदर प्रकल्पाचे उद्दिष्ट महानगरपालिका शाळांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणे, 29,000 हून अधिक विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणे असल्याचे या वेळी मा. श्री बी. टी. पाटील, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग यांनी सांगितले.
या प्रकल्पात विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे शिक्षकांना त्यांच्या अध्यापन पद्धतींमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे समावेश करण्यासाठी क्षमता निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास उपयोग होत आहे. तसेच प्रशिक्षणाच्या वेळी स्वतः उपस्थित राहून मा. श्री बी. टी. पाटील, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग यांनी प्रशिक्षणाचा बारकाईने आढावा घेतला. तसेच, प्रशिक्षणाच्या अंती शिक्षकांकडून या प्रशिक्षणाचा अभिप्राय ही घेतला. पुढील 5 वर्षांसाठी मनपा शिक्षकांना सदर प्रशिक्षण वर्षातून दोन वेळा देण्यात येणार असून देखभाल व तांत्रिक सहकार्य सुद्धा पुरवले जाणार आहे.
या वेळी मनपा शाळेतील शिक्षकांनी सदर प्रशिक्षण हे शिक्षक क्षमता विकासाबरोबरच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी उपयोगी असल्याचे सांगितले. तसेच, आधुनिक व डिजिटल सामग्रीचा वापर करण्याची मनपा शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना संधी या प्रकल्पा मार्फत मिळत आहे. याचा परिणाम मनपा शाळेतील पटसख्या वाढीस नक्कीच होणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
सदर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण होण्यासाठी मा. श्री बी. टी. पाटील प्रशासन अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली मनपा शाळा क्र. ४३ व २१ चे केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, प्रशिक्षक सागर मोरे, शंकर टिळे, कैलास महाजन, स्वप्ना खरे, प्रतिभा पाटील, गौरी गोसावी, फलक नाज, वैभव कुमार, ओंकार देशपांडे, अश्विनी पवार तसेच पॅलेडियम टीमचे अमर माळी, अमित टेंभूर्णे यांचे सहकार्य लाभले.