नाशिकरोड शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांच्या विषयी रविवारी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल

नाशिक महापालिका आयुक्त डॉ.ए.एन.करंजकर यांनी पत्रकारांशी साधला संवाद

नाशिकरोड शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांच्या विषयी रविवारी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्याने खळबळ माजली असून यामध्ये विद्यमान महीला आमदारांनी उडी घेतल्याने प्रकरण थेट नाशिकरोड पोलिस ठाण्यात पोहचले,दरम्यान पोलिसांनी दोन युवकांना ताब्यात घेत त्यांचा जाबजबाब नोंदवला,
याबाबतचे वृत्त असे की देवळाली मतदार संघाचे माजी आमदार व ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांच्या विषयी एका युवकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली असता त्यास विरोधक आणि समर्थ यांनी कमेंट्स पाठवल्या दरम्यान देवळालीच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फोन करून शिंदे येथील दोन युवकांना अटक करण्याची मागणी केली असता पोलिसांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेत नाशिकरोड पोलिस ठाण्यात आणले ही घटना समजताच माजी आमदार योगेश घोलप,तनुजा घोलप हे समर्थकांसह पोलिस ठाण्यात पोहचले,पोलिसांनी युवकांचा जाब जबाब घेऊन त्यांना सोडून दिले दरम्यान यावेळी बोलतांना माजी आमदार घोलप यांनी सांगितले की विद्यमान आमदार सत्तेचा दुरुपयोग करीत असून दडपशाही करण्याचा प्रयत्न करीत आहे,त्या महीला असल्याने आम्ही त्यांचा सन्मान करीत आहोत मात्र त्यांनी त्यांची पातळी सोडू नये नाही तर आम्हाला जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत

 

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *