दि. २५/०४/२०२४ हॉकर्स व पथविक्रेत्यांवर धडक कारवाई

नाशिक महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पंचवटी व नाशिक पूर्व विभागातील परिसरात अनाधिकृत बॅनर्स व हॉकर्स तसेच पथविक्रेत्यांवरही धडक कारवाई करणेत आलेली आहे.

नाशिक मनपा हद्दीत दोन विभागात अतिक्रमण विभागाकडून दि. २४/०४/२०२४ रोजी देवधर कॉलेज, निलगीरी बाग, रिलायन्स पेट्रोल पंप, तसेच सारडा सर्कल व्दारका, तिगरानिया रोड, तपोवन, काठे गल्ली इ. परिसरात अतिक्रमण निर्मूलन पथकाने संयुक्त कारवाई केलेली आहे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून मनपाचा दैनंदीन पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला होता. या कारवाईच्या दरम्यान पंचवटी व नाशिक पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी तसेच अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख प्रविण बागुल नाशिक पूर्व विभागाचे अतिक्रमण पथक प्रमुख जिवन ठाकरे व अतिक्रमण कर्मचारी निर्मूलन वाहनांसह उपस्थित होते.

तसेच नाशिक पूर्व व पंचवटी विभागामार्फत विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र व राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पंचवटी विभागातील देवधर कॉलेज, निलगीरी बाग, रिलायन्स पेट्रोल पंप या परीसरात रस्त्यालगत अनधिकृत व्यवसाय करणा-यांवर अतिक्रमण निर्मूलन पथकाने संयुक्त मोहिम राबवून कारवाई केली. या ठिकाणी असलेला वाहतुक मार्ग / पथमार्ग मोकळा करुन देण्यात आलेला आहे. कारवाई दरम्यान लोखंडी कुलूप बंद, मोठे चार चाकांची हातगाडी वरिल टपरी ०१ नग साहित्य जप्त करण्यात आले.
नाशिक पूर्व सारडा सर्कल व्दारका, तिगरानिया रोड, तपोवन, काठे गल्ली या परीसरात रस्त्यालगत अनधिकृत व्यवसाय करणा-यांवर अतिक्रमण निर्मूलन पथकाने संयुक्त मोहिम राबवुन कारवाई केली. सदर ठिकाणी असलेला वाहतुक मार्ग / पथमार्ग मोकळा करुन देण्यात आलेला आहे. कारवाई दरम्यान स्टॅन्ड बोर्ड -०४ नग, लोखंडी बाकडा मोठा ०१ नग, पोल बॅर्नर-१० नग, जाहिरात बोर्ड -०५ नग इ. साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर कारवाईत जप्त करण्यात आलेले सर्व साहित्य ओझर येथील मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या गोडाऊनमध्ये जमा करण्यात आले.

मनपा कार्यक्षेत्रातील सर्व नागरीकांना या मोहीमेच्या माध्यमातून जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, ज्या मिळकती अनधिकृत किंवा विनापरवाना असतील त्यांनी स्वतः हून अनधिकृत बांधकामे काढून घेण्यात यावे. अन्यथा मनपाकडून कडक कारवाई करण्यात येईल, तसेच रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणा-यांवरही दैनंदीन कारवाई करण्यात येईल, असे आवाहन अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त नितीन नेर यांनी केले आहे.

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *