मानसिक आरोग्याला हवे ते खाद्य द्या मानसिक तणाव निर्माण होणार नाही.
एसीपी,डॉ.सिताराम कोल्हे
जागतिक मानसिक आरोग्य दिन
दि. 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो या अनुषंगाने
न.ब.ठाकुर विधी महाविद्यालयातील,नाशिक यांचे आर.एन.टी हॉल येथे दि 10.10.2023 स.11.00 वा. मानसिक आरोग्य दिन आयोजित केला या करीता महाविद्यालयाने ए सी पी डॉ सिताराम कोल्हे सर यांचे मानसिक आरोग्य सुदृढ कसे ठेवावे या विषयावर विधी महाविद्यालयातील विधी विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र,प्राचार्य श्री कादरी सरांनी केले.
मानसिक आरोग्या संदर्भात 297-300डिसऑर्डर संपुर्ण जगात सुरु आहेत. आणि ह्या पासुन बचावासाठी स्व:त मानसिक आरोग्याला खाद्य देणे गरजेचे आहे. खाद्य म्हणजे स्वाभाविक आपल्याला ज्या कृतीतून आनंद मिळतो ती कृती दिवसभरातुन एकदा 10 मी वेळ देऊन करावी, दिवस सुरु होण्यापुर्वी अनुलोम विलोम प्राणायाम, ध्यान हे करावे म्हणजे शरीरातील हॅप्पी हार्मोन्स यांच्यात वाढ होऊन मानसिक तनाव दूर होतो असे ए सी पी डॉ. कोल्हे यांनी सांगताना प्रत्येकाने आवड, छंद युवकांनी जोपासावे व परीक्षा काळात आवर्जून प्राणायाम करुन परीक्षेची तयारी करावी असे म्हणत विधी विद्यार्थी यांना शैक्षणिक आयुष्या करीता शुभेच्छा दिल्या.
सुत्रसंचलन विद्यार्थी कु. युवराज सगर तर कु.संकेत मुठाळ व विद्यार्थी यांनी व्याख्यान व्हावे यासाठी प्रयत्न केले
कार्यक्रम समन्वय डॉ.प्रा.पेंढारकर सर यांनी आभार व्यक्त केले विद्यार्थीनी कु.अवंती खेर हिने प्रातिनिधिक स्वरुपात राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाचा समारोप केला.