*दि.२४/०७/२०२३*
नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात खुबा बदलण्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली.
नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये म्हणजेच बिटको हॉस्पिटलमध्ये खुबा गुडघे व कुठल्याही प्रकारचे फ्रॅक्चर तसेच गंभीर प्रकारचे शस्त्रक्रिया करणे शक्य झालेले आहे.मनपाच्या बिटको रुग्णालयात अस्थिरोग तज्ञ एमबीबीएस,एम.एस,एमसी एच अर्थो,(यु.के) डॉ.राजेंद्र भंडारी यांनी स्वतः रुग्णालयात सोमवारी खुबा बदलण्याची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे.मनपाच्या रुग्णालयात खुबा बदलण्याची यशस्वी शस्त्रक्रिया तसेच कृत्रिम सांधेरोपण महापालिकेच्या दवाखान्यात केले जात असल्याची माहिती यावेळी डॉ.राजेंद्र भंडारी यांनी दिली.