चिमुकल्या नायरा विसपुतेची इंडिया बुक रेकॉर्ड कडून दखल : मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते चिमुकल्या नायराचा सन्मान

नाशिकच्या सिडको परिसरात राहणाऱ्या अडीच वर्षीय नायरा विसपुते या चिमुकलीने शेकडो संस्कृत श्लोक, आरती, हिंदी मराठी गीतांचे पाठांतर करून सादरीकरण तसेच २०० हून अधिक वस्तूंची ओळख सांगून इंडिया बुक रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदविल आहे. तिच्या या यशाबद्दल आज नाशिक येथील कार्यालयात राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी तिचा सन्मान केला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी नायराचे कौतुक करत तिला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

 

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *