पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊनही शासनाच्या जागेवर अतिक्रमण केल्याने विहीर खोदण्यास मज्जाव ,
अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील मौजे सुळे पिंपळगाव ग्रामस्थांनी महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेला गट क्रमांक 86 या क्षेत्रातील तीन हेक्टर 92 आर शासनाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे दंडमशाहीच्या जोरावर येथील शेतकऱ्याने अतिक्रमण करून त्या जमिनीतून उत्पन्न घेत आहे, अनेक दिवसापासून शासनाला निवेदन देऊन देखील जाग येत नसल्याने आणी गावाला पाणी प्रश्न हा गंभीर होत असून देखील जलजीवन योजनेअंतर्गत गावाला पाण्यासाठी विहीर मंजूर होऊनही शासनाच्या जागेवर विहीर खोदण्यास शेतकरी मज्जाव करीत असल्याने शासनाने अतिक्रमण हटवण्यासाठी शेवगाव गेवराई राज्य मार्गावर येथील सरपंच रमेश माने ,भास्कर मासाळकर ,भाऊसाहेब मासाळकर, श्रीकांत भुसारी ,ऋषिकेश देशमुख .आदींसह ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले , मात्र मंडल अधिकारी विष्णू खेडकर यांनी कुठल्याही प्रकारचे ठोस आश्वासन न देताच आंदोलन मागे घेण्यात आले ,
यावेळी बोधेगाव दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक गावंडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल नानासाहेब गरजे ,पोलीस नाईक सुखदेव धोत्रे , पोलीस हेड कॉन्स्टेबल ससाने ,पोलीस कॉन्स्टेबल म्हस्के आदींनी चोक बंदोबस्त ठेवला होता ,
पांडुरंग निंबाळकर
अहमदनगर , शेवगाव