भारत विकास परिषद, प्रशांत जैन आणि उमेश राठी यांच्या माध्यमातून गेल्या सतरा वर्षापासून १५ ऑगस्ट निमित्त भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते

भारत विकास परिषद, प्रशांत जैन आणि उमेश राठी यांच्या माध्यमातून गेल्या सतरा वर्षापासून १५ ऑगस्ट निमित्त भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.यावर्षी नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय बेळे आणि नाशिक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाला. या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात दोन्हीही मान्यवरांनी रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आगळ्यावेगळ्या पद्धतीने रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांनी रक्तदान करून केले. यावेळी उपस्थित नागरिकांनमध्ये कौतुकाचा विषय ठरला. पंचमुखी हनुमान ट्रस्टचे अध्यक्ष भक्ती चरणदास महाराज आणि स्वामी कंठानंद महाराज यांच्या हस्ते दोघांनाही प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले प्रेरणा सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र बागुल यांनी या रक्तदान शिबिराच्या आयोजकांना शुभेच्छा दिल्या.यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *