दिनांक २५जुलै२०२३
- 🎯वेध न्यूज वृत्तसेवा🎯
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी.
राज्यातील मुंबई वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला, आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या त्रीसदस्य पिठापुढे आज सुनावणी होणार आहे. ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग व सदस्य बाबत महाविकास आघाडी सरकारने केलेली वाढ शिंदे फडणवीस सरकारने ही संख्या पूर्वत करण्याच्या घेतलेल्या निर्णय प्रभाग रचनेचे अधिकार आयोगाकडून आपल्याकडे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय आधी विविध मुद्द्यांवरील याचिकांवर ही सुनावणी होईल गेल्या दोन-तीन वर्ष या निवडणुका रखडल्याने नाशिक महानगरपालिकासह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यभार प्रशासनाकडे आहे.
या सुनावणी कडे सर्वच राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे
🎯वेध न्यूज वृत्तसेवा🎯