देवळाली मतदार संघात राष्ट्रवादी युवकचा दौरा

नाशिकरोड, प्रतिनिधी देवळाली मतदार संघातील गावांचा राष्ट्रवादी प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली दौरा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदराव पवार यांच्याबाबतच्या लोकभावना जाणून घेण्यात आल्या.

निवडणुकांमध्ये गद्दारांना त्यांची जागा दाखवा आणि पवार यांच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन गणेश गायधनी, तालुकाध्यक्ष विष्णू थेटे यांनी केले. वंजारवाडी, लोहशिंगवे, दोनवाडी, गिरणारे, वडगाव दुगाव, माडसांगवी, ओढा, शिलापुर, लाखलगाव, गंगापाडळी, कालवी आदी ठिकाणी हा दौरा झाला. विनायक कांडेकर, निलेश शिरोळे, गणेश आगळे, प्रशांत रोकडे, ज्ञानेश्वर कसबे, शरद पेखळे, बाळासाहेब कांडेकर, प्रभाकर कांडेकर, तानाजी जाधव, पद्माकर जोशी, योगेश जाधव, विकास जाधव, त्र्यंबक कांडेकर, संतु लोणे, अक्षय बर्वे आदी उपस्थित होते.

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *