नाशिक महानगरपालिकेच्या सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले उदय मुकुंद धर्माधिकारी यांचा सेवापुर्ती सोहळा नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर यांच्या हस्ते संपन्न झाला. नाशिक महानगरपालिकेच्या सेवेत गेल्या ३० वर्षापासून उदय मुकुंद धर्माधिकारी हे कार्यरत होते. विविध विभागात त्यांनी अभियंता पदाची जबाबदारी पार पाडली. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर त्यांना पदोन्नती मिळाल्यामुळे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी यांच्या सेवापूर्ती सोहळ्यास सर्वच विभागातील अधिकारी अभियंते कर्मचारी उपस्थित होते. उदय धर्माधिकारी यांना पुढील आयुष्य निरोगी व सफल जाण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी देखील उदय धर्माधिकारी यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नाशिक महानगरपालिकेचे प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर,कर उपायुक्त श्रीकांत पवार,पर्यावरण उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे,समाज कल्याण उपायुक्त प्रशांत पाटील,शहर अभियंता शिवकुमार वंजारी, मुख्य लेखा परीक्षक श्रीमती प्रतिभा मोरे, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड नव्यानेच अधीक्षक अभियंता पदाचा पदभार स्वीकारलेले संजय अग्रवाल,अविनाश धनाईत यांसह कार्यकारी अभियंता बाजीराव माळी,गणेश मैड राजेंद्र शिंदे,रविंद्र धारांणकर,सचिन जाधव,संदेश शिंदे,जितेंद्र पाटोळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या विविध विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उदय धर्माधिकारी यांनी सेवापूर्ती सत्कार सोहळ्या निमित्याने मनोगत व्यक्त केले . यावेळी कुठल्याही नस्तीचा संपूर्ण अभ्यास केल्याशिवाय त्यावर स्वाक्षरी करू नये.संस्थेचे हित नेहमी जोपासवे,आपली जबाबदारी ही नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या नागरिकांना सेवा देण्याची असल्याने प्रामाणिकपणे सर्वच अधिकारी कर्मचारी काम करीत आहे.कामाची व्याप्ती वाढलेली असली तरी आपण सर्व जिद्दीने काम करीत आहात या शब्दात सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक करून सत्काराला उत्तर देताना उदय धर्माधिकारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमास उदय धर्माधिकारी यांच्या पत्नी गिरीशा उदय धर्माधिकारी, चिरंजीव अथर्व उदय धर्माधिकारी आदींसह अनेक मान्यवर या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यास उपस्थित होते. या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले.
याच कार्यक्रमात नव्याने अधीक्षक अभियंता पदाची सूत्र स्वीकारणारे संजय अग्रवाल आणि अविनाश धनाईत यांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी केला.