नाशिक महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मेरी माटी मेरा देश या अभियान

अंतर्गत समारंभ पूर्वक अमृत कलश अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मेरी माटी मेरा देश या उपक्रमा अंतर्गत नाशिक महापालिकेच्या सर्व ६ विभागीय कार्यालये व मनपा शाळा अंतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व विभागातील व शाळांमधील अमृत कलश संकलित करून त्यातील माती दिल्ली येथे पाठविण्यात येणाऱ्या कलशात टाकून तो कलश मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांचे कडे सुपूर्द करण्यात आला होता.
तत्पूर्वी मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरून व्ही.एन.नाईक शिक्षण संस्था संचलित हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,सिडकोतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या लेझीम पथक व ढोल पथकाने सादरीकरण करून मिरवणुकीने संकलित झालेले सहा विभागीय कार्यालयातील व मनपाच्या शाळांमधील सर्व अमृत कलश घेऊन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली.स्वागत कक्ष येथे या मिरवणुकीचा समारोप झाला. या मिरवणुकीत अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,पर्यावरण उपायुक्त तथा मेरी माटी मेरा देश या उपक्रमाचे समन्वयक डॉ.विजयकुमार मुंडे,अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत, उद्यान अधिक्षक विवेक भदाणे,वित्त व लेखाधिकारी सुरेखा जाधव,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण,घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ आवेश पलोड, पशुवैद्यकीय अधिकारी प्रमोद सोनवणे,सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना कुटे,कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात पंचप्राण शपथ देण्यात आली देण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी केले.या कार्यक्रमात मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती उपक्रमाचे समन्वयक डॉ. विजयकुमार मुंडे यांनी विशद केली.शहरात गेल्या महिनाभरापासून मेरी मिट्टी मेरा देश हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त तथा पश्चिम विभागीय अधिकारी नितीन नेर नगरसचिव तथा नाशिक रोड विभागीय अधिकारी मदनहरिश्चंद्र पंचवटी विभागाचे विभागीय अधिकारी योगेश रकटे सातपूर आणि सिडको विभागाचे विभागीय अधिकारी डॉक्टर मयूर पाटील पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी हिरामण जाधव तसेच नाशिक महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी बी टी पाटील यांनी हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी केले.

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *