विंचूर- निफाड तालुक्यातील विंचूर येथे औद्योगिक वसाहत आहे. या औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांचे पाणी जवळच असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरीत जात आहे. त्यामुळे विहिरीतील पाणी दूषित होत आहे. त्या विहिरीतील दूषित पाण्यामुळे विहिरीतील मासे मरत आहे व शेतकऱ्यांचे आरोग्य आणि शेतीही धोक्यात जात आहे. विंचूर औद्योगिक वसाहतीतील कंपनी के. एल. सी. वाईन्स प्रायव्हेट लिमिटेड व एक्झॉटिक. फ्रुट्स प्रायव्हेट कंपनी या दोन्ही कंपन्यांचे दूषित पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आणि विहिरीत जात आहे.ह्या कंपन्यांनी कुठल्याही प्रकारची दूषित पाण्याचे नियोजन केलेले नाही. जवळच असलेले गोरख वाळके, सुभाष नगर यांची शेती विंचूर औद्योगिक लगत असल्यामुळे कंपन्यांचे सांडपाणी त्यांच्या विहिरीत व शेतात जात आहे. अशा अनेक शेतकऱ्यांना या कंपन्यांचा खूप त्रास आहे. काही कंपन्यांचे मजूर शेतकऱ्यांच्या शेतात शौचालयास बसत आहे. शेतकरी वारंवार कंपनीत जाऊन सांगतात तरी देखील त्यांची कोणीही दखल घेत नाही. त्यांना उलट सुलट उत्तर देऊन, करू असे बोलतात. तरी (विंचूर) सुभाष नगर औद्योगिक वसाहत मधील कंपन्यांनी दूषित पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी (विंचूर)सुभाष नगर मधील शेतकऱ्यांनी केली आहे.
वेध न्यूज चॅनलचे बातमी प्रतिनिधी – सुनील क्षिरसागर, विंचूर.