विंचूरला मनसेचा ‘एक सही संतापाची’ उपक्रम..

तीन तिघाडा काम बिघाडा-मनसे कार्यकर्ते

विंचूर येथील तीन पाटीवर सकाळी साधारण अकरा वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांच्या आदेशाने एक सही संतापाची हा उपक्रम राबवीतांना विंचूर व विंचूर पंचक्रोशीतील सर्व नागरिक व मनसेचे कार्यकर्ते उपस्थित राहून राजकारणाचा चिखल झाला आहे, म्हणून घोषणाबाजी करत, ‘एक सही संतापाची’ आपला संताप व्यक्त करत मनसे बोर्डवर आपल्या स्वाक्षऱ्या नोंदवत होते.

यावेळी उपस्थित मनसेच ॳॅड. रतन कुमार इचम, महिला प्रदेश उपाध्यक्षा वडूजा डेरे, जिल्हा उपाध्यक्ष अनंत नाना सांगळे, जनहित जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल बनभेरू, निफाड तालुका अध्यक्ष संजय मोरे, येवला तालुका अध्यक्ष नरसी दरेकर, जनहित तालुका अध्यक्ष मयूर राऊत यांच्या उपस्थितीत विंचूर शहरात मोठ्या प्रमाणावर एक सही संतापाची हा उपक्रम राबविण्यात आला. त्याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर मनसे सैनिक व नागरिक उपस्थित होते.

वेध न्यूज चॅनलचे बातमी प्रतिनिधी – सुनील क्षिरसागर, विंचूर

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *