येवला मतदारसंघातील लासलगाव विंचूरसह ४२ गावांच्या सरपंच लोकप्रतिनिधींचा छगन भुजबळ यांच्या निर्णयाला पाठींबा

लासलगाव प्रतिनिधी : कैलास उपाध्ये

येवला मतदारसंघातील लासलगाव, विंचुरसह परिसरातील ४२ गावांचे सरपंच आणि लोकप्रतिनिधीनी छगन भुजबळ यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. आज सकाळी भुजबळ फार्म येथे भेट घेत सर्व लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी भुजबळांना पाठिंबा दिला.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, भाऊसाहेब भवर, दत्तात्रय डुकरे, शिवाजी सुपनर, दत्ता रायते, सचिन दरेकर, आत्माराम दरेकर, चंदु लांडूबले, बबन शिंदे, मंगेश गवळी, माधव जगताप, राहुल डूमरे, सुरेखा नागरे, प्रदीप तीपायले, पांडुरंग राऊत, विशाल नागरे, अविनाश सालगुडे, उन्मेष डूमरे, सुनिता शिंदे, वाल्याबाई शिंदे, मनीषा चव्हाणके, मनीषा वाघ, आकाश वाघ, सचिन रुकारी, बापू बागल, ज्ञानेश्वर वाघ, वाल्मिक सोदक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सर्व सरपंच म्हणाले की, पवार साहेब बरे झाले आपण अशी चुक केली, त्यामुळे आमचा विकास झाला. छगन भुजबळ यांनीच आमच्या भागाचा विकास केला आहे. जी चुक भुजबळांच्या बाबतीत केली असे आपण म्हणालात ती चुक आपण सगळ्या मतदारसंघात करा सर्व महाराष्ट्राचा विकास होईल अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या. तसेच आम्ही आपल्या सोबत आहोत. येवला लासलगावसह सर्व लोक आपल्या सोबत कायम आहेत. राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील आपल्या सोबत आहेत असा विश्वास त्यांची मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे व्यक्त केला.

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *