नाशिक महानगरपालिकेच्या वतीने भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे डॉ.भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास उपायुक्त डॉ.प्रशांत पाटील, नितीन नेर,वित्त व लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूट, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी,विभागीय अधिकारी राजाराम जाधव,योगेश रकटे,उपलेखाधिकारी गुलाबराव गावित,सहाय्यक आयुक्त जवाहरलाल टिळे,जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद,अजय कमोद,शेखर चौरे,नितीन गंभीरे,जयश्री गांगुर्डे,सोनल पवार, दिपक पुरी,संजय पटेल,महेंद्र विभांडिक,सागर पिठे,सुजित देशमुख,यश बारगजे,सोमनाथ धात्रक आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.