नवीन नाशिक (सिडको ) :
येथील स्वामी विवेकानंदनगरमध्ये महानगरपालिकेचे नागरिकांच्या विविध समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. पावसाळा सुरू होऊनही अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्यांची छाटणी झालेली नसून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी पावसामुळे मोठ-मोठे खड्डे होत असून काही ठिकाणी फक्त मुरूम टाकले जातात परंतु ह्याच मुरमामध्ये मोठी खडे असल्याने दुचाकीच्या वाहनाने ते रस्त्यावर चाका ला लागून नागरिकांच्या अंगावर लागतात खड्ड्यांची समस्या ही कायमची सोडण्याची नागरिकांना मागणी होत आहे त्याचबरोबर ड्रेनीज वारंवार चोकोफ होत असून अनेक वेळा नागरिक महानगरपालिका विभागीय कार्यालयात तक्रार करूनही ड्रेनेज चोकोपची समस्या जैसे स्थितीत आहे.
या सर्व समस्यांची दखल महापालिकेने न घेतल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
-प्रतिनिधी चंदन खरे