भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप या कार्यक्रमा अंतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पालकमंत्री ना. दादा भुसे व प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर शहरातील आमदार देवयानी फरांदे,सीमाताई हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना मनपाचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी पंचप्रण शपथ दिली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपीय कार्यक्रमा निमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नाशिक महानगरपालिकेच्या वतीने ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान मेरी मिट्टी मेरा देश या अभियाना अंतर्गत नाशिक शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पंचप्रण शपथ नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. पंचप्रण शपथ नाशिक शहरातील महानगरपालिकेच्या सर्व शाळेतील विद्यार्थी शिक्षक नाशिक महानगरपालिकेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी ही शपथ घेतली आहे. या वेळी अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानायत,प्रदीप चौधरी,उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर,श्रीकांत पवार,प्रशांत पाटील,नितीन नेर,शिक्षण अधिकारी बी.टी.पाटील,नाशिक सिटीझन फाेरमचे माजी अध्यक्ष जितुभाई ठक्कर, हेमंत राठी, फाेरमचे संस्थापक अध्यक्ष विक्रम सारडा, अार्किटेक्ट सचिन गुळवे, रामकृष्ण अाराेग्य संस्थेचे स्वामी कंठानंद महाराज, नाशिक क्रेडाईचे अध्यक्ष कृणाल पाटील, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे,सचिव राजेंद्र अहिरे,अायमाचे अध्यक्ष निखील पांचाळ, तानचे सागर वाघचाैरे, डाॅ. श्रीया कुलकर्णी, सचिन जाेशी,उमेश वानखेडे,रवी महाजन अादींसह भाजपचे महानगरप्रमुख प्रशांत जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बाेरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनपाचे माजी गटनेते गजानन शेलार नामको बँकेचे उपाध्यक्ष प्रशांत दिवे,सचिन अहिरराव,संदीप कुयाटे,भारती जाधव नाशिक शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी नाशिक महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी यांनी पंचप्रण शपथ घेऊन देशभक्तीचा जागर केला. यावेळी ही शपथ नाशिक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी उपस्थितांना दिली.