भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपीय कार्यक्रमात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार मनपाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन च्या प्रांगणात प्रशासक तथा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या हस्ते येथे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी राष्ट्रगीत,राज्य गीत झाले. यावेळी सर्व उपस्थितांना पंचप्रण शपथ देण्यात आली. यावेळी अग्निशमन दल,मनपा सुरक्षा विभाग व महाराष्ट्र सुरक्षा बल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रधवजला सलामी दिली.
*सांस्कृतिक कार्यक्रम* मुख्यालयाच्या प्रांगणात कार्यसम्राट फाउंडेशनच्या गीता शामसुखा यांच्या वतीने देशभक्तीपर गीतांवर तीन नृत्य सादर केले.त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांनी प्रतिसाद देऊन कौतुक केले.
*दुचाकी व सायकल रॅलीस प्रारंभ*
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आयोजित दुचाकी व आयडीटी या संस्थेच्या वतीने आयोजित हेल्मेट वापरण्याबाबत प्रबोधनपर मोटार सायकल रॅलीला प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांनी हिरवा झेंडा दाखवून मोटरसायकल व सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला
या कार्यक्रमास
अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,लक्ष्मीकांत साताळकर, डॉ. विजयकुमार मुंडे,श्रीकांत पवार,प्रशांत पाटील, शहर अभियंता शिवकुमार वंजारी,जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद,उपसंचालक नगर नियोजन राहुल बाविस्कर, मुख्य वित्त वलेखा अधिकारी नरेंद्र महाजन, मुख्य लेखापरीक्षक प्रतिभा मोरे, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.कल्पना कुटे, मुख्य अग्निशमन दल प्रमुख संजय बैरागी आदींसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात इंडियन सेक्युरिटी प्रेस यांच्या सुरक्षा जवानांनी मेरी मिट्टि मेरा देश अभियानांतर्गत माती कलश प्रशासक तथा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्याकडे सुपूर्द केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना पंचप्रण शपथ जनसंपर्क अधिकारी योगेश यांनी दिली.