सर्व केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांना सूचित करण्यात येते की, “दप्तर मुक्त शनिवार”या उपक्रम अंतर्गत भारताची चांद्रयान मोहीम ३ या विषयावर व्याख्यान आणि स्लाईड दाखवाव्यात म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे ज्ञानाबरोबर मनोरंजन होईल. त्यानंतर आपापल्या पातळीवर विविध खेळाचे नियोजन करावे. दर शनिवारी वेगवेगळ्या प्रकारे नियोजन व कार्यवाही करावी आणि याचे व्हिडीओ तयार करून ग्रुपवर शेअर करावेत, म्हणजे इतर शाळांना देखील प्रेरणा मिळेल, तसेच दररोज विदयार्थी, पालक, शिक्षक ७ते ९या वेळेत मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्यासंबधी सूचना पालक मेळावा आयोजित करून विद्यार्थी व पालक यांचे समुपदेशन करण्यात यावे, छोटी गोष्ट जरी असली तरी याचे दुरगामी परिणाम चांगले दिसणार आहेत. मेळावा घेऊन त्याचा प्रत्यक्ष उपयोग होत आहे किंवा कसे? याची चाचपणी व्हावी अशी माफक अपेक्षा करतोय आणि तुम्हाला नम्रपणे आवाहन करतो.तुम्हा सर्वांना या कार्यासाठी शुभेच्छा!धन्यवाद 🙏