ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटर बर्ड लोगो बदलला आहे. आता तुम्हाला ब्लू बर्डच्या जागी “X” दिसेल. मस्कला “X” नावाचे “सुपर अॅप” तयार करायचे आहे, जे चीनच्या WeChat सारखे आहे.X.com वर गेल्यास Twitter उघडेल. इलॉन मस्क आणि ट्विटर सीईओ लिंडा याकारिनो यांचे प्रोफाइल बॅज देखील बदलले आहेत. बॅजवर निळ्या पक्ष्याच्या जागी X लिहिलेले आहे. ट्विटरमध्ये मोठे बदल करण्यात येणार असून, लवकरच आपण ट्विटर ब्रँडला अलविदा करू. ट्विटरसोबतच हळू हळू सर्वच पक्ष्यांना आपण उडवून लावू, अशा आशयाचं ट्विट मस्क यांनी केलं होतं. यामुळे अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं होतं.