शिखरस्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्थेतर्फे शुक्रवार (दि.5 ) ते 7 जानेवारी तीन दिवसीय मकर संक्रात महोत्सव

नाशिकरोड,( प्रतिनिधी)येथील शिखरस्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्थेतर्फे शुक्रवार (दि.5 ) ते 7 जानेवारी तीन दिवसीय मकर संक्रात महोत्सव नाशिकरोडच्या देशपांडे मंगल कार्यालया शेजारील स्वानंदी हॉल येथे सुरु होणार आहे. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी ही माहिती दिली.

शिखर स्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्थेतर्फे आयोजित होणाऱ्या मकर संक्रांत महोत्सवाकडे विंटर फेस्टिवल म्हणून बघितले जाते. महोत्सवामध्ये खाद्यपदार्थ, ड्रेस मटेरियल, साडी, कुर्ती,इमिटेशन ज्वेलरी, नेल आर्ट, म्युझिकल शो,लाईव्ह बेंगल, पॉटरी मेकिंग, पॉपकॉर्न,डार्ट गेम, टॅटू, मेहंदी यासह मनोरंजनाचा खजिना देखील असणार आहे. नाशिकरोड परिसरात दरवर्षी अशा प्रकारचा एकमेव महोत्सव साजरा केला जातो, त्याचप्रमाणे यंदा महोत्सवात मतदान नाव नोंदणी, पंतप्रधान योजनांची माहिती आणि रक्तदान शिबिराचे आयोजनाचे देखील नियोजन आहे. परिसरातील सर्वांनी कुटुंबासोबत आनंद लुटण्यासाठी मकर संक्रांत महोत्सवास अवश्य भेट द्यावी, असे आवाहन शिखर स्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा संगीता गायकवाड यांनी केले आहे

Share this News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *