रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरीकडून येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयास शालेय विज्ञान साहित्य भेट म्हणून देण्यात आले. कार्यक्रमास पाहुणे म्हणून महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद उपस्थित होते. या प्रसंगी रोटरीच्या अध्यक्षा डॉ. मीनल पलोड, बालरोग तज्ज्ञ डॉ. संगीता लोढा, सरचिटणीस पुरुषोत्तम फुलसुंदर, शिक्षणाधिकारी मधुकर बच्छाव, संचालक रमेश शिंदे उपस्थित होते. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग करण्यास व विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून रोटरी कडून हा उपक्रम आम्ही राबवला असल्याचे डॉ. पलोड यांनी सांगितले. बाल वयात आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत डॉ. लोढा यांनी मार्गदर्शन केले.तर जनसंपर्काची आवड असल्यास सामाजिक कार्य शक्य असल्याचे मुर्तीमंत उदाहरण आजचा विज्ञान साहित्य प्रदान सोहळा असल्याची भावना योगेश कमोद यांनी व्यक्त केली. शिक्षणाधिकारी मधुकर बच्छाव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य गजानन घरटे, पर्यवेक्षक निवृत्ती कमोदकर यांनी सूत्रसंचालन तर गोकूळ माळी यांनी आभार मानले. मुख्याध्यापक सुनील शेवाळे, डॉ. कीर्ती वर्मा, अनुराधा जगताप याच्यासह शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

