दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांच्या खिशावर चांगलाच ताण पडत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सराफ बाजारात बुधवारी सोन्याच्या किमतीत किंचित प्रति तोळा १०० रुपयाची वाढ दिसून आली. दुसरीकडे चांदीच्या दरात १००० रुपयाची वाढ झाली.
सराफ बाजारात आज, गुरुवार ५ डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोने ७०,४०३ रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. २४ कॅरेट सोने विनाजीएसटी ७६,८०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. चांदीचा एक किलोचा भाव ९२,००० रुपये असून लग्न सराईमुळे ग्राहकांची बाजारात वरदळ वाढली असून वाढलेले दर बघून ग्राहक आर्थिक संकटात सापडला असल्याचे चित्र दिसत आहे