नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमा आयोजित चौदावे निमा इंडेक्स प्रदर्शन येत्या 6 डिसेंबर पासून ठक्कर मैदान त्रंबक रोड येथे आयोजित करण्यात आले असून तब्बल सहा वर्षानंतर उद्योजकांचा कुंभमेळा नाशिक मध्ये भरणार आहे शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात डोम उभारणी कामाचं भूमिपूजन संपन्न झाले आहे सहा वर्षांच्या खंडानंतर निमाचे हे औद्योगिक प्रदर्शन होत असल्याने सर्वांनाच त्याची कमालीची उत्सुकता असून कनेक्ट,कोलॉब्रेट अँड क्रिएट ही थीम घेऊन औद्योगिक निमा इंडेक्स प्रदर्शन भरवण्यात आले आहे
6 ते 9 डिसेंबर दरम्यान ठक्कर मैदान, त्रंबकरोड,येथे भरविण्यात येणार असून त्यासाठी उभारण्यात येत असलेल्या डोमचे भूमिपूजन दीपक जी चांदे, आणि TDK चे एक्सकूटिव्ह चेअरमन प्रबल राय, यांच्या हस्ते शुक्रवारी मोट्या उत्साहात संपन्न झाले आहे
तत्पूर्वी निमा चे ट्रेझरर उद्योजक राजेंद्र वडनेरे सह पत्नी यांच्या हस्ते मंत्र उच्चारात विधिवत पूजन करण्यात आले तसेच मंत्र उच्चाराचा जयघोष करीत फुलांची उधळण करत उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कुदळ मारून आणि मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले
यावेळी आयोजित कार्यक्रमात दीपक चंदे, आणि TDK चे एक्सकूटिव्ह चेअरमन प्रबल राय यांचा निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आणि उपाध्यक्ष आशिष नहार यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
या प्रदर्शनाच्या माध्यमातून उद्योग जगतासाठी चांगले वातावरण निर्माण होणार असल्याचे मत TDK चे एक्सकूटिव्ह चेअरमन प्रबल राय यांनी व्यक्त केले आहे
या औद्योगिक प्रदर्शनात 450 हून अधिक स्टॉल्स असून त्याचे बुकिंग फुल झाले असून वॉटरप्रूफ,फायर प्रूफ बरोबरच आत्याधुनिक एअरपोर्ट व संपूर्ण मूळ प्लॅटफॉर्म असलेले डोमची उभारणी हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य येथे बघायला मिळणार असून नाशिकच्या पुढील पन्नास वर्षासाठी हे प्रदर्शन खूप महत्त्वाचे असून महाराष्ट्राच्या नकाशावर नाशिक एक नंबर शहर म्हणून ओळखले जावे अशी भावना प्रदर्शनाचे गोल्ड स्पॉन्सर बांधकाम व्यवसायिक दीपक चंदे यांनी व्यक्त केली आहे
चार दिवसांत राज्य तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून दीड लाखांहून अधिक लोक प्रदर्शनास भेट देणार असून उदयोन्मुख उद्योजकांचे नवनवीन कलाविष्कार बघण्याची संधी लोकांना उपलब्ध होणार आहे.यांच बरोबर प्रदर्शनाद्वारे नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी प्रलंबित प्रश्न सोडवणे, धोरणात्मक घोषणा प्रत्यक्षात आणणे, आणि स्थानिक उद्योगांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे यावर भर दिला जाणार आहे. ‘डेस्टिनेशन नाशिक’ ही संकल्पना पुढे नेऊन, अधिकाधिक गुंतवणूकदार आणि उद्योगांची नाशिककडे वाटचाल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचा विश्वास निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी व्यक्त केला आहे .
या कार्यक्रमाप्रसंगी सचिव निखिल पांचाळ, उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र अहिरे,कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सहसचिव मनीष रावल, माजी अध्यक्ष विवेक गोगटे रमेश वैश्य शशिकांत जाधव मनीष कोठारी क्रेडाईचे कृणाल पाटील कैलास पाटील नितीन आव्हाड, दिलीप वाघ नाना देवरे, विजय जोशी, हेमंत खोंड, यांच्यासह कार्यकारिणी सदस्य नीमा आयमा चे पदाधिकारी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते
https://youtu.be/NBFrCf7ZVEw?si=GEt7Nq5ThPMlUgS6